महाराष्ट्रराजकारण

बारामती शहर व तालुक्याचा लॉकडाऊन 20 सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय

कोरोनाचे रुग्ण सध्या वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने तालुका व शहरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यासाठी बारामती शहर व तालुक्याचा लॉकडाऊन येत्या 20 सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज शहरातील व्यापारी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बारामती तालुक्यातील माळेगाव, पणदरे व गुनवडी या गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी सोमवारी होणार आहे, त्याच धर्तीवर बारामती शहरातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

बुधवार, शुक्रवार व शनिवारी शहराच्या विविध प्रभागात घरोघरी जाऊन 640 लोक ही तपासणी करणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली. ही तपासणी करताना प्रत्येक घरात त्या घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे, याचा विचार करता लॉकडाऊनखेरीज ही बाब शक्य होणार नाही, त्यामुळे रविवारपर्यंत लॉकडाऊन कायम असावा, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली. यामुळे हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बारामतीजवळ इंदापूर देखील लॉक करण्यात आला आहे.