महाराष्ट्रराजकारण

‘या’ दिवशी होऊ शकतो जिम आणि मंदिरांसंबंधी निर्णय – संजय राऊत

कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन चालू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात मागील पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे देशासह राज्यातील धार्मिक स्थळे आणि जिम बंद आहेत. ती पुन्हा सुरु करावीत अशी मागणी विविध धार्मिक संघटना तसेच राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

याचदरम्यान काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १५ ऑगस्टपासून जिम सुरु होतील, असे सांगितले होते. पण त्यानंतर त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अनलॉक ४ ला १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून त्यावेळी जिम आणि धार्मिकस्थळे सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे. या संदर्भात राज ठाकरे यांच्याकडे देखील मंदिरे आणि जिम चालू करण्याची मागणी केली होती.

दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना जिम, मंदिरं यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. यामुळे आता तरी हा निर्णय होणार की नाही हे आता लवकरच समजेल.