लाइफस्टाईलव्यापार

सौंदर्यप्रसाधनांच्या मागणीत झाली मोठी घट

Newslive मराठी- गेले तीन चार महिने ब्युटी पार्लर, सलून बंद असल्याने आणि आता अनलॉक मधेही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद नसल्याने सौंदर्यप्रसाधनाच्या मागणीत 90 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कार्यालये बंद आहेत.

शिवाय लग्नसोहळे, सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रमांचे प्रमाण खूपच कमी असल्याने सौंदर्यप्रसाधनांचा वापर मर्यादित आहे. परंतु, याचा फटका सौंदर्यप्रसाधनाच्या विक्रेत्यांना बसला आहे. त्यात दुकानात सौंदर्यप्रसाधनांच्या तपासणी आणि उत्पादनाच्या परताव्यास बंदी घालण्यात आली आहे.

सलून, ब्युटी पार्लर, केशकर्तनालये सुरू असली तरी त्वचेशी संबंध येणाऱ्या बहुतेक सौंदर्योपचारास मनाई आहे. या कालावधीत लग्नसोहळे, इतर मोठे कार्यक्रमही नाहीत. तसेच बहुतांश लोक घरातच असल्याने सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत नाहीत.

परिणामी, शहरातील सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्या दुकानांचा व्यवसाय ठप्प आहे. याचबरोबर त्वचेशी संपर्क येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विक्रेत्यांनी सौंदर्यप्रसाधनांच्याटेस्टिंगला तसेच विक्री केलेल्या उत्पादनाच्या परताव्यास मनाई केली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही सावधपणे खरेदी केली जात आहे.