तंत्रज्ञानदेश-विदेश

 पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

Newslive मराठी-  पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात
येत आहेत.

बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत. राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी 36 विमाने देणार असून त्यासाठी 59 हजार कोटींचा करार झाला होता.

फ्रान्सनमधील बोर्डक्स विमानतळावरून या विमानांनी उड्डाण केले असून ती संयुक्त अरब अमिरातीत एक थांबा घेऊन सात हजार किमीचे अंतर कापून
भारतात येणार आहेत. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला सर्व 36 राफेल विमाने दिली जाणार आहेत.