महाराष्ट्रराजकारण

पुणे स्थित परळीकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी धनंजय मुंडे पुणे येथे

Newslive मराठी – परळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले वचनपूर्ता आभार मेळाव्याचे आयोजन धनंजय मुंडे मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने १९ जानेवारी २०२० रविवारी समीर लाॅन्स, रावेत पुणे येथे आयोजन केले आहे.

राजकारणात प्रवेश केल्यापासून २५ वर्षाच्या संघर्षानंतर स्वकर्तृत्वावर विधानसभा विजय व नंतर कॅबिनेट मंत्रीपद असा प्रवास ही एक मोठी झेप घेतली यासाठी जनतेने दिलेली साथ व कामाची पावती मोलाची ठरली. विधानसभा निवडणूकीपूर्वी दिलेली विकासाची दिशा हि जनतेला खूप आवडली ज्याचे रूपांतर मतदारांनी मतदानात केले आणि नवीन उद्योगशील परळीसाठी मतदान केले व मतदारानी दुरदृष्टी असलेला नेता निवडला.

परळीतील नागरी सत्कारानंतर उद्या होणाऱ्या आभार मेळाव्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. उद्या ते मतदारसंघातील सर्वांची भेट घेतील व विकासाची पुढील दिशा ठरवतील. विधानसभेच्या निवडणूकीनंतर पुणे स्थित परळीकर यांचे आभार मांडण्यासाठी आज मेळावा आयोजित केला आहे

दिलेला शब्द पाळणारा असा लोकमान्य नेत्याच्या स्वागतासाठी आणि भेटणासाठी सर्व परळीकर बांधव आतुरतेने वाट पाहात आहेत.

उद्या होणाऱ्या या आभार मेळाव्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्य म्हणून उद्या भेटीसाठी येणाऱ्या सर्व बांधवाना पुष्पहार किंवा बुके न आणता, वही, पेन घेऊन येण्याचे आवाहन धनंजय मुंडे मित्र मंडळाच्या नतीने करण्यात आले आहे. जी नंतर शाळेमध्ये वाटप करण्यात येईल. यामुळे गरजू विद्यार्थींना याचा लाभ होईल.