बारामती महाराष्ट्र राजकारण

धनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप

Newslive मराठी–   परळी दि.19 पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे पुण्य ज्याच्या पाठीशी आहे, त्यांचा असा उल्लेख करणार्‍यांचा परळीची जनता तिव्र शब्दात निषेध करू लागली आहे.

शुक्रवार परळीत झालेल्या एका सभेत पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा दुष्ट राक्षस असा उल्लेख करत या राक्षसाच्या तोंडाला जॅमर बसवा, असे भाषण केले. हे भाषण ऐकुण उपस्थित भाजपा कार्यकर्ते ही अस्वस्थ होवून ताई हे काय बोलत आहेत असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. अनेकांनी तेथेच अशा वक्तव्याची नाराजी व्यक्त केली. वर्तमानपत्रात आज या संबंधी बातम्या प्रसिध्द होताच शहरात संतापाची लाट उसळली असून, ताई पातळी सोडू नका असा वडीलकीचा सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे.

परळीच्या जनतेसाठी तुम्ही भलेही विकास केला नसेल, मात्र सांगण्यासाठी काही नाही म्हणून विरोधकांना राक्षस म्हणणे ही कोणती संस्कृती ?  कोणते संस्कार ? आज स्व.गोपीनाथराव मुंडे हे आज हयातीत असते तर त्यांनाही हे आवडले नसते, एकीकडे धनंजय मुंडे आपल्या भाषणात ताईंविषयी बोलताना आमच्या बहिणबाई, आमच्या ताईसाहेब असा आदरार्थी उल्लेख करतात. दोन उमेदवारांमधील हा फरकही परळीकरांना आता दिसू लागला आहे.

परळीकरांच्या पंकजताईना कोपरखळ्या

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *