महाराष्ट्रराजकारण

भाजपाला सत्तेतून घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही- धनंजय मुंडे

Newslive मराठी-  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटलं अशा बातम्या सुरु होत्या. त्यावरून मुंडे यांनी सताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे.

मागच्या तीन चार तासापासून चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही ऐवढे निब्बर आहोत की भाजपा- शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असं मुंडे यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिवसाढवळ्या या मोदी सरकारने आपल्याला लुटले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन यात्रा काढली आहे. याला साथ द्या परिवर्तन नक्कीच होईल असा, विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.