कोरोनामहाराष्ट्रराजकारण

धनंजय मुंडेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Newsliveमराठी -करोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबत पत्रकार संघाच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले (वय 48) यांचा 28 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झालाआहे. तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय 61) यांचाही करोनाची बाधा झाल्याने सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . दोन्ही पत्रकारांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती जेमतेम असुन महाविकास आघाडी सरकारने घोषणा केल्याप्रमाणे करोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा करोना बाधित होऊन मृत्यू झाला तर कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती.