खेळमहाराष्ट्र

धोनी- रोहितचे चाहते आमने-सामने; ऊसाच्या शेतात नेऊन एकाला मारहाण

कधी कोण कोणाबर कोणत्या कारणावरून वाद घालेल काही सांगता येत नाही. किरकोळ वादातून मारामारी होण्याच्या घटना तर रोजच होत असता परंतु, दोन खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये वाद होऊन झालेल्या मारामारीचे प्रकार क्वचितच घडतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या चाहत्याला चक्का उसाच्या शेतात नेहून चोप दिल्याचे समोर आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने आले. त्यातूनच एकाला उसाच्या मळ्यात नेऊन चोप देण्यात आला. नुकतीच महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

त्यावेळी कुरुंदवाड येथे त्याच्या कौतुकाचे होर्डिंग्ज चाहत्यांकडून लावण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसांत रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला. रोहितला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्याही चाहत्यांनी कुरुंदवाड शहरात अभिनंदनाचे होर्डिंग लावले. या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये आतल्या आत टेन्शन सुरू झालं.

रोहितच्या अभिनंदनासाठी लावलेल्या होर्डिंग्जची अज्ञाताने फाडाफाडी केली. त्यामुळे या चाहत्यांच्या गटातील धुसफूस आणखी वाढली. होर्डींग्ज फाडाफाडी केल्याच्या कारणावरून रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने राग व्यक्त करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन मारहाण करण्यात आली.