Newslive मराठी- दौंड तालुक्यातील केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल विद्यालयात शुक्रवारी (ता.7) डिजिटल प्रशिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाचे आयोजन दौंड व महाराष्ट्र महिला आयोग यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी हजेरी लावली.
याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा, वाखारीच्या सरपंच शोभा शेळके, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, प्राचार्य गोविंद राजे निंबाळकर या कार्यक्रमाचे आयोजक नंदकुमार जाधव, विद्यार्थींनी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, महिला व विद्यार्थीनींनी डिजिटल रित्या साक्षर बनावे याकरता या अभियानाचे आयोजन केले होते.
बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन