महाराष्ट्रराजकारण

रोहित पवार आणि रविकांत तुपकर यांच्यात बंददाराआड एकतास चर्चा

Newslive मराठी- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा शरद पवार यांचे नातु रोहीत पवार व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यात १८ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात एक तास बंदव्दार चर्चा झाली. या चर्चेतील माहिती बाहेर कळू शकली नसली तरी,आघाडीतील जागावाटप संदर्भातील बुलडाणा येथील लोकसभेच्या जागेवर चांगलीच खलबते झाल्याचे समजतय.

या बाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व शरद पवार यांचे नातु रोहित पवार हे १८ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी जिल्हयात आले होते. या भेटीनंतर रोहित पवार हे बुलडाणा येथे आले असता काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी रोहित पवार व स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची भेट झाली. जवळपास एक तास रोहित पवार व रविकांत तुपकर यांनी बंदव्दार चर्चा केल्याचे समजते. या चर्चेत आ. हर्षवर्धन सपकाळ सुध्दा सहभागी होते. रोहित पवार व रविकांत तुपकर चांगले मित्र सुध्दा आहेत, या निमित्ताने हे बुलडाणेकरांनाही कळले. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतीम टप्प्यात आहे. बुलडाणा लोकसभेच्या जागेवरूनच आघाडी आणि स्वाभिमानीमध्ये जोरदार वाद सुरू आहे.

बुलडाण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना खा. राजू शेट्टी यांनी मात्र रविकांत तुपकरांसाठी बुलडाण्याच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यानुषंगाने आघाडीमध्ये बुलडाणा लोकसभेची जागा रविकांत तुपकरांना सुटण्याची दाट शक्यताही वर्तविल्या जात आहे. या पार्श्वभुमीवर उभय नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीत रोहित पवारांनी रविकांत तुपकरांची मनधरणी केली काय ? यावरही तर्क काढला जात आहेत.

या दोन युवा नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे बाहेर कळू शकले नाही. यासंदर्भात त्यांनी या विषयावार बोलणेही टाळले, मात्र एक तासाच्या या भेटीत बऱ्याच राजकीय चर्चा झाल्या, त्यात बुलडाणा लोकसभा मतदार संघावर बरेच खलबते झाल्याचे कळते.

दरम्यान रोहीत पवार व रविकांत तुपकर यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने बुलडाण्याच्या राजकीय वर्तुळात या युवा नेत्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगत आहे.

पवार कुटुंबातील हे 4 सदस्य लढवणार लोकसभा…

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi