महाराष्ट्रराजकारण

पत्रकारांना कोरोना योद्धाचा दर्जा देण्यासाठी अधिवेशनात चर्चा- राजेश टोपे

कोरोना काळात पोलीस तसेच आरोग्य कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सर्वजण सन्मान करतात. यामध्ये पत्रकार देखील जीवाची बाजी लावून काम करत आहेत. म्हणून पत्रकारांना ५० लाखांचा विमा देण्याबाबत केंद्र सरकारचा एक जीआर आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत बोलून लवकरच निर्णय घेऊ. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकारांना कोरोना योद्धाचा दर्जा देण्यासाठी आम्ही अधिवेशनात चर्चा करणार आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनानंतर मंत्री रोजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पत्रकारांचा आदर नक्कीच करतो आणि करत राहू असेही ते म्हणाले. कोरोना उपचाराबाबत राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत.

कोरोना सोबत जगताना एसएमएस ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. सध्या आपल्याकडे कोरोनावर प्रतिबंधक लस नाही. त्यावरील लस येण्यासाठी किती महिने लागतील सांगता येत नाही, असेही टोपे यांनी सांगीतले. यामुळे पत्रकारांना दिलासा मिळाला आहे. या काळात अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू देखील होत आहे.