बातमीमहाराष्ट्र

प्रभू रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी- जितेंद्र आव्हाड

Newslive मराठी- राम मंदिर भूमिपूजन जवळ आले आहे. मात्र भूमिपूजनावरून राज्यात जोरदार राजकारण पेटले आहे. यातच आता प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
या मुद्द्यावरून त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राज्यात राम मंदिरावरून तसेच भूमिपूजन कार्यक्रम निमंत्रणावरून राजकीय वातावरण तापले आहे. रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी असेही ते म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती करणे वेगळे. असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे. ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे, मर्यादा पुरुषोत्तम राम असे आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचे एवढे काही नाही. त्यांना वाटतंय ते करत आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनासाठी जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या 1 कोटी मधला एक रुपया ही आला नाही!

-फडणवीस सरकारने आणलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारने केली रद्द

-पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर कोपरखळी

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi