कोरोनामहाराष्ट्र

कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा!

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. देशात कोरोना रुग्ण वाढतच आहेत. कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत विलक्षण वाढ होतं आहे. तसेक सध्या सर्वांचं लक्ष कोरोनाचं लस कधी उपलब्ध होईल याकडे लागले आहे. अशातच कोरोना लसीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

ट्रम्प यांनी AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचली असल्याचे सांगितले आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची माहिती दिली आहे. याबाबत व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम्ही काही महिन्यातच हे करून दाखवले असेही ट्रम्प म्हणाले. यामुळे आता अमेरिका देखील कोरोनाच्या लसीजवळ आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.