महाराष्ट्र

‘बर्ड फ्लू’बाबत घाबरू नका, चिकन शिजवून खा- दत्तात्रय भरणे

NEWSLIVE मराठी- सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही पक्षामध्ये बर्ड फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळून आलेली नाहीत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

बहुतांश नागरिक हे चिकन शिजवून खातात. त्यामुळे कोणतेही विषाणू 100 अंश डिग्री सेल्सिअसला जिवंत राहत नाहीत, कोणत्याही प्रकारचा पक्षी मृत झाल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्या पक्षाचे स्वॅब, रक्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचेही पालमंत्री भरणे यांनी सांगतिले.

सोलापूर जिल्ह्यात सध्या 27 लाख कोंबड्या आहेत. त्यामध्ये अंडी देणाऱ्या 18 लाख कोंबड्या आहेत. बॉयलर जातीच्या 9 लाख कोंबड्या सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चिकन विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.