महाराष्ट्र राजकारण

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका – संजय राऊत

Newslive मराठी- विधानसभेचे निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना शाब्दीक चकमक सुरू आहे. त्यातच
आम्हाला सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

राजकारणात कोणीही संत नसतो. असंही ते
म्हणाले आहेत. शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं असी मागणी केली आहे. आम्ही भाजपासोबत असलेल्या युतीवर विश्वास ठेवतो. परंतु भाजपाने आम्हाला सरकार स्थापनेसाठी पर्याय शोधण्यास भाग पाडू नये असं राऊत यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला होता.

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *