महाराष्ट्रराजकारण

कंगनाबद्दल आता काही प्रतिक्रिया देऊ नका, मातोश्रीवरून आला आदेश

शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणावत यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. या प्रकरणावरून राज्यात चांगलेच गदारोळ सुरु असताना आज कंगना मुंबईत दाखल होण्याआधी बीएमसीने तिच्या ऑफिसवर कारवाई केली आहे. मात्र कंगनाबद्दल कोणीही प्रातिक्रिया देऊ नका असे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहे. आता शिवसैनिक हा आदेश पाळणार का हे लवकरच समजणार आहे.

अभिनेत्री कंगना रनावात आणि शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद हा चव्हाट्यावर आला आहे. कंगनाने मुंबईची तुलना काश्मिरशी करून हा वाद सुरू केला. शिवसेनेने मुंबईत येऊ न देण्याचा इशारा दिला होता, मात्र कंगना आता मुंबईत दाखल झाली आहे.

आज कंगनाला मुंबई महानगरपालिकेने दणका दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याच्या कारवाईस मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली. मात्र कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच ही कारवाई थांबविण्यात आली आहे.

कंगनाने उद्धव ठाकरे यांची तुलना बाबरशी केली आणि मुंबईला पाकिस्तान म्हणल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. केंद्राने कंगनाला सुरक्षा देखील दिली आहे. आता उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजणार आहे.