Newslive मराठी – पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते. प्रियंका यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली असून त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पदभार स्वीकारतील.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’ अशा घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता प्रियंका गांधीच्या नियुक्तीनंतर नवीन घोषणा तयार केल्या आहेत. काही घोषणांमध्ये प्रियंकांची तुलना थेट त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी करण्यात आली आहे तर काही घोषणांमध्ये प्रियंका थेट मोदींना आवाहन देतील असं कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.
प्रियंका गांधी यांच्यासंदर्भातील काही घोषणा-
प्रियंका गांधी आँधी हैं… दुसरी इंदिरा गांधी हैं
दहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका
हिंद की शेरणी, हिंदोस्तान की आवाज… प्रियंका प्रियंका..
अब आएगी उत्तर प्रदेश में काँग्रेस की जीत की आंधी, क्योंकि आ गई हैं प्रियंका गांधी
अब आएगी असली आँधी जब लडेंगी प्रियंका गांधी
प्रियंका गांधी आयी है नई रौशनी लायी है