आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

ड्रग्स प्रकरणात आता दीपिका पादुकोनचे नाव आले समोर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर आता ड्रग्स प्रकरणात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे नाव समोर आल्यानंतर दीपिका पादुकोनचे नाव समोर आले आहे. यापैकी श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला या आठवड्यात NCB चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. रियाने सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते. दुसरीकडे रिया हिची मॅनेजर जया सहा हिची चौकशी सोमवारी NCB ने केली होती. तिच्यासह व्हाट्सअँप ग्रुपवर चॅट झाल्याचे उघड झाले आहे.

ग्रुपवर डी आणि के या नावाने ड्रग्ससंदर्भात बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. डी नावाने बोलणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याचे समजले जात आहे. ‘डी’ ला काहीही करून माल हवा आहे आणि ‘के’ तिच्यासाठी मालाची व्यवस्था करणार आहे. असे या संवादातून उघड झाले आहे.

ही चॅट ऑक्टोबर २०१७ ची आहे. NCB ने सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर या दोघांची सोमवारी चौकशी करण्यात आली. दरम्यान NCB या आठवड्यात सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सीमोन खांबाटा या सगळ्यांना चौकशीला बोलावणार आहे.

श्रद्धा कपूरचे नाव दीपेश सावंत आणि जगदीश बोटवाला यांच्या चौकशीतून समोर आले आहे. तिचा सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी आणि ड्रग्स कनेक्शनमध्ये थेट संबंध जरी नसला तरी NCB तिच्याकडे चौकशी करणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.