बारामती

बारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई

Newslive मराठी- बारामतीत एका अल्पवयीन मुलासह पाच जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली. अशी माहिती उपविभागीय आधिकारी नारायण शिरगावकर यांनी व पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

राहुल बाबुराव ढावरे, डाबर उर्फ किशोर संजय ढोरे, अभिजीत उर्फ छोटा डाबर अनिल ढावरे, बल्ली उर्फ अजय सुभाष देशमुख (सर्व रा. बारामती, जि. पुणे) तसेच एक अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांविरुध्द बारामती शहर पोलिसांनी पोलिस महानिरीक्षकांकडे मोकाचा प्रस्ताव सादर केला होता.त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाचही जणांवर मोकाअंतर्गत कारवाई सुरु झाली आहे.
या पाचही जणांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे अठरा गुन्हे दाखल असल्याचे अशोक धुमाळ यांनी सांगितले.

दरम्यान,  खून, खुनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी, जबरी चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाच जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली.