महाराष्ट्रराजकारण

कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!

राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदावरुन त्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षात तुकाराम मुंढे यांची १५ वेळा बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या ठिकाणी त्यांना राजकीय संघर्षाला सामोरे जावे लागले, यामुळे कोठेही ते जास्त दिवस टिकले नाहीत. पण कामकाजात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली त्यासाठी त्यांना प्रत्येकवेळी मोठा संघर्ष देखील करावा लागला.