कोरोनामहाराष्ट्र

ई-पास रद्द! आता राज्यांतील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी आता पासची गरज नाही

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र लॉकडाउनच्या तीन टप्प्यांनंतर अनलॉक घोषित करण्यात आला. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल केला जात आहे. यामध्ये अनेक गोष्टीत शिथिलता देण्यात आली आहे.

आता वाहतुकीबाबत तसेच प्रवासाबाबत राज्याअंतर्गत आणि राज्या-राज्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीवरील बंदीवरून केंद्राने राज्यांना फटकारले आहे. त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे निर्दश दिले आहेत. केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात तिथल्या परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्बंधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत.

वाहतुकीवरील निर्बंधाचा परिणाम मोठा होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारांकडून लादले जाणारे हे निर्बंध गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारांनी राज्यांतर्गत आणि देशात कुठेही सामान वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध लादू नयेत,असं केंद्र सरकारने आज दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे आता कुठेही जाण्यासाठी नागरिकांना ई पासची गरज लागणार नाही. त्यामुळे आता कोठेही प्रवास करता येणार आहे.