महाराष्ट्रराजकारण

‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार

Newslive मराठी- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपिक काढला आहे . बाळासाहेब यांच्या जीवनावर आधारित’ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित करून शिवसेना भावनिक मते मागण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या संबधी व्हिडिओ पवार यांनी ट्वीट केला आहे.

पहा व्हिडिओ- 

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी सर्वत्र चित्रपट गृहांत प्रदर्शित केला जाणार आहे . नुकताच या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यात आला . या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे. चित्रपटात शिवसेनाप्रमुखांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने साकारली आहे . तर चित्रपटाची निर्माती आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे .