कोरोनामहाराष्ट्र

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती.

राज्यात काल २१ हजार २९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. यासोबत राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के इतके झाले आहे. यामुळे अजून काळजी घेण्याची गरज आहे.