महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरे, आदित्य आणि सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा अर्धवट माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे तपास पाठवला आहे.

सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार आहे. माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह गुजरातमधील आमदार नाथाभाई ए पटेल यांच्याविरोधातील तक्रारी प्रशासकीय समिक्षेवर आधारे चौकशीसाठी पाठवली आहे.

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करणार्‍या शिवसेनेच्या नेत्याने हे रुटीन असल्याचं सांगितले आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, तक्रारदारांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ काही पुराव्यांचा हवाला दिला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.