महाराष्ट्रराजकारण

राज्यात विधानपरिषद उपसभापतीपदासाठी आज निवडणूक

राज्यात कोरोनाचे सावट आहे. यातच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आता विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार नीलम गोऱहे यांनी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत भाजपने आमदार भाई गिरकर यांना उमेदवारी दिली असली तरी आमदार नीलम गोऱहे यांचे पारडे जड आहे.

पावसाळी अधिकेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ही निवडणूक होणार आहे. भाजपकडून आमदार प्रसाद लाड आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नावाची चर्चा होती. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्य उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. यावर आता कोणाची निवड होणार हे लवकरच समजेल. रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड केली जाणार आहे.