आंतरराष्ट्रीयमनोरंजन

माझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप

Newslive मराठी-  कॅन्सरचं वाढतं प्रमाण  काही दिवसांपासून उभी ठाकलेली मोठी समस्या आहे.  जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने एकिकडे जनजागृतीविषयक कार्यक्रम होताना कलाविश्वातील सेलिब्रिटीही या दिवशी आपल्या अनुभवांचं कथन करत या आजाराशी लढण्याची प्रेरणा दिली. अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने केलेली पोस्ट सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

ताहिराने इन्स्टाग्रामवर तिचा एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्यावर कर्करोगामुळे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेचा व्रणही स्पष्टपणे दिसत आहे. ताहिराचा चेहरा या फोटोत पूर्णपणे दिसत नसला तरीही हलकीशी दिसणारी तिच्या चेहऱ्याची झलक आणि त्यावरुन व्यक्त होणारे भाव हे काही लपलेले नाहीत.

आज माझा दिवस आहे….. #worldcancerdayच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशा करते की प्रत्येकजण हा दिवस त्यांच्या परिने साजरा करत असेल. त्याच्यासोबतच असणारे न्यूनगंड दूर सारत असेल. माझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिकच आहे असं मी मनापासून मानते. सुयोग्य असं काही नसतंच मुळी. तुम्ही जसे आहात तसं स्वत:ला स्वीकारण्यातच खरा आनंद आहे. माझ्यासाठीही हे सारं आव्हानात्मकच होतं. पण, हा फोटो पोस्ट करण्यामागे आजाराचा दिवस साजरा करणं हा हेतू नसून माझ्यातील एका अशा जिद्दीला साजरा करणं होता जी मला गवसली आहे’, असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलं.

या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमार जायचयं डेटवर

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ