महाराष्ट्रराजकारण

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- पंकजा मुंडे

Newslilve मराठी-  दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे असे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. लोणी काळभोर येथे बोलत होत्या.

दहशतवादाने सर्व जगाला पोखरले असून, त्याच्या झळा भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. दिवसेंदिवस फोफावत चाललेला दहशतवाद ही केवळ भारतासमोरच नव्हे तर जगासमोरच मोठी समस्या बनत चालली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशवादी हल्ल्याने अत्यंत दु:ख झाले असंही मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, हुतात्मा जवानांच्या परिवाराच्या दु:खात सरकार सामील आहे. आपल्या मुलांना सैनेत पाठविण्यासाठी धैर्य लागते. दहशतवाद हा कर्करोगासारखा आजार आहे. त्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्याबरोबरच आपणही सज्ज आहोत.असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन

उरीपेक्षा मोठा बदला घेतला जाईल- मुख्यमंत्री

आम्ही भारतासोबत आहोत – अमेरिका

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi