बारामती महाराष्ट्र

बारामतीत पार पडला माजी सैनिक परिवार मेळावा

Newslive मराठी – (सूरज देवकाते)  बारामतीत प्रथमच आजी- माजी सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक परिवार भव्य मेळावा तसेच वीर नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन बारामतीत नवज्योत महिला सोसायटी याठिकाणी करण्यात आले होते .

वीर सैनिकांच्या मुलांनी देशभक्तीपर गीत गाऊन ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ हा संदेश दोत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या देशावर परकीय आक्रमण गेल्या शेकडो वर्षापासून झाली व होत आहेत. आपल्या देशावर झालेली परकीय आक्रमणे आजी-माजी सैनिक आणि पोलीस दल यांनी परतावून लावली. असे आजी- माजी सैनिक संघटनेचे शहराध्यक्ष यांनी व्यक्त केले.

दरम्यान, ज्या वीर सैनिकांनी आपल्या देशासाठी जीवाची आहुती दिली. त्यांच्या वीर नारींचा सन्मान, सत्कार यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुबेदार लकडे, हनुमंत निंबाळकर नगरसेविका कमल कोकरे छाया पानसरे, लीलावती शेलके, राहुल भोहीटे यांच्या हस्ते करण्यात आला. ही संघटना आतापर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम घेत आली आहे. या संघटनेने महिलांसाठी बचत गट तसेच पतसंस्था स्थापन करून दिली आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *