महाराष्ट्रराजकारण

फडणवीसांनी दिली होती राज्यपालपदाची ऑफर, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट!

भाजपचे नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून लक्षात नाराज आहेत. उघडपणे ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध मोर्चाच उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते थेटपणे फडणवीसांवर आरोप करत आहे. शनिवारी त्यांनी पुन्हा एकदा तोफ डागली. मंत्रिपद गेल्यानंतर फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

नंतर मला राज्यसभेत पाठवतो म्हणून सांगितलं. मात्र आश्वासन देण्यापलिकडे काहीच झालं नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त कली. खडसे म्हणाले, विधानसभेत फडणवीसांनी मला त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली.

त्यानंतर ते म्हणाले, मला राज्यसभेत पाठवतो असं सांगण्यात आलं. नंतर दुसरीच तीन नावं पाठवली मला डावलण्यात आलं. माझ्याकडे काही फोटो आणि पुरावे आहेत, ते उघड केले तर सगळ्यांनाच धक्का बसेल असं सांगत त्यांनी इशाराही दिला. या प्रकरणी आता फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र पक्षात खडसे हे नाराज आहेत.