महाराष्ट्रराजकारण

फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचे एसओपी तयार करा

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असून महिला सुरक्षेच्या विषयात दुर्लक्ष होत आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे.

सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती.

पनवेल, मालाड, मिरा भाईंदरमधील क्वारंटाईन सेंटर, पुण्यातील सह्याद्री हाँस्पिटल अशा राज्याच्या वेगवेगळ्या भागात महिला रुग्णांवर झालेल्या अत्याचारांचा उल्लेख या पत्रात केला आहे. पूर्वी झालेल्या काही घटनांचा तपशीलही यामध्ये नमूद केला आहे. कोणताही घटना झाली तर केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावरही कारवाई करावी अशी मागणी या पत्रात केली आहे.