महाराष्ट्रराजकारण

५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधानाना देशाचे संरक्षण करण्यात अपयश- शरद पवार

Newslive मराठी- पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन देशभरात निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांनीही निषेध व्यक्त केला आहे. देशाचे संरक्षण करण्यात ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

संपूर्ण देश शहिदांच्या पाठीशी उभा आहे, मात्र राजकारण करण्याची ही वेळ नाही. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. ज्या मार्गावर दहशतवादी हल्ला झाला आहे तो इतरांशी तुलना करत सुरक्षित परिसर आहे. इतकी वर्ष आपली वाहने या मार्गावरुन जात आहेत असं पवार यानी सांगितलं.

दरम्यान, सध्या शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे  नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही. असंही पवारांनी सांगितलं आहे.

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…