महाराष्ट्रराजकारण

शेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पेनचा कणा आहेत असे वक्तव्य केले आहे. ‘असे म्हणतात की जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना अत्यंत प्रभावीपणे करु शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचंच उदाहरण आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांनी कोरोना काळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा कणा आपल्या देशातले शेतकरी आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने कृषी विधेयक मंजूर केली आहेत.

कोरोना काळात सगळं जग नव्या आव्हानांना तोंड देतो आहे. कोरोना काळाचा एक फायदाही झाला आहे की अनेक कुटुंब एकत्र आली. मात्र आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आता लोकांना जास्त काळ घरात राहणं कठीण होत चाललं आहे. मात्र हल्लीच्या काळात कुटुंब पद्धतीही बदलली आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले आहे.