महाराष्ट्रराजकारण

हा तर शेतकऱ्यांना भांडवलदारांचा ‘गुलाम’ बनण्याचा डाव- राहुल गांधी

सध्या कृषी विधेयकावरून दिल्लीत जोरदार राजकारण पेटले आहे. या विधेयकावरून राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेत मंजूर करण्यात आलेली तीन वादग्रस्त कृषी विधेयके मोदी सरकार रविवारी राज्यसभेत मांडणार आहे. राज्यसभेत ते मंजूर झाल्यास शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मात्र, भारतीय जनता मोदी सरकारचा हा डाव कधी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘किसान विरोधी नरेंद्र मोदी असे म्हटले आहे.

मोदी सरकारचा कृषीविरोधी ‘काळा कायदा’ देशातील शेतकऱ्यांसाठी घातक आहे. कृषी उत्पन्न बाजार पेठा बंद झाल्यानंतर MSP कसे मिळणार? MSP ची हमी मोदी सरकार का देत नाही? असे सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

यावरून दिल्लीत जोरदार राजकारण पेटले आहे. यावरून मोदी सरकार मधील मंत्र्यानी राजीनामा देखील दिला आहे.