देश-विदेशशैक्षणिक

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; 10 ऑगस्टला होणार सुनावणी

Newslive मराठी- कोरोनाच्या संकटात परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी करत विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला युवा सेनेसह देशभरातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. या याचिकांवर आज निकाल येण्याची शक्यता होती.

मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबल्याची चिन्हं आहेत.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट करण्यात आली होती.

या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. न्यायालयानं या याचिकांवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे याचिकांवर आता 10 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक

-राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा