कृषीमहाराष्ट्र

अखेर राज्य सरकारकडून पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी सुरु

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दुधाच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन देखील केली. अखेर राज्य सरकारने एक महिन्याच्या गॅपनंतर पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरु केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिलिटरमागे होणारा ५ रुपयांचा तोटा कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटरला २५ रूपयांचा दर मिळणार आहे. याशिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचा कात्रज डेअरी प्रतिदिन तीन लाखांचा होत असलेला तोटा आता पुर्णपणे कमी होणार आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊ लागले होते. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर किमान २५ रुपये दर आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत होता. मात्र आता ही एक दिलासादायक बातमी आहे.