आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

अखेर पबजीसह केंद्र सरकारकडून ११८ अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय

भारत चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. आता केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये अगदी धोकादायक तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे. हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. आता चीन यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी होत होती. अखेर आज मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.