आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

हनुमानाची जात शोधणं हा नालायकपणा – उद्धव ठाकरे

टिम Newslive मराठी:  प्रभू रामचंद्रांच्या प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात आहे. हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घालायला हवा. हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार हा नालायकपणा आहे,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाबली हनुमान दलित असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हनुमान हे आपल्याच जातीचे कसे होते हे सांगण्याची स्पर्धाच भाजपच्या नेत्यांमध्ये लागली आहे.

कुणी हनुमानाला मुस्लिम ठरवले आहे, तर कुणी जाट, आर्य, ब्राह्मण, आदिवासी, जैन, चिनी ठरवू लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून या सर्व वक्तव्यांचा  समाचार घेतला आहे.