आंतरराष्ट्रीयआरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

Newslive मराठी- रोगप्रतिकारक शक्ती दोन प्रकारची असते, एक म्हणजे जन्मापासून एखाद्या व्यक्तीमध्ये असणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि दुसरी म्हणजे व्यक्ती स्वतः रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

व्यायाम आणि आहाराच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. अॅन्टीऑक्सिडंट असलेल्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. आहारात सर्व धान्यांचा समावेश करा. शरीरासाठी उपयुक्त असणारे मासे खा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

– तुमच्या दिवसाची सुरुवात ही गरम पाणी पिऊन करा. तसंच दिवसात सलाड, सूप आणि गरम – ताजे अन्न खा.

– हवाबंद असलेले पदार्थ, शीतपेय या गोष्टी टाळा.
– अन्नपदार्थांबाबत स्वच्छता बाळगा

– आल्याचा चहा, ग्रीन टी प्या.
– सर्दी आणि ताप यांना प्रतिबंध करण्यासाठी आलं आणि तुळस घातलेला चहा प्या.
– बदाम, अक्रोड आणि जर्दाळू हे पदार्थ खा

महत्वाच्या बातम्या-

डोळ्यांना जळजळ होते? करा हे उपाय

पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’

या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi