खेळबारामतीमहाराष्ट्र

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) आपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये पहिल्यांदाच बीपीएल (बारामती प्रिमियर लिग) चे आयोजन करण्यात आले आहे. ही बीपीएल स्पर्धा बारामती येथील आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा आज 5 फेब्रुवारी 2020, बुधवारी पासून बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. आजपासून 9 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.

या स्पर्धेत एकूण आठ संघांचा लिलाव पद्धतीने मालकी हक्क विकत घेण्यात आला आहे. यात सुपर स्ट्रायकर्स, मित्र प्रेम पँथर्स, आर्यन चॅलेंजर्स, मेदड रोकस्टार्स, केजीएफ किंग, नवयुग ब्लास्टर्स, एसीसी फायटर्स, भापकर 007 टायगर्स आदी संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघाने हजार पॉईंट्स खर्चून 12 खेळाडूंची खरेदी केली आहे.

तसेच प्रत्येक संघात दोन खेळाडू हे राखीव आयोजकांकडून पुरविण्यात आले आहेत. यात 143 फॉर्म भरून घेतले असून त्यातील 98 खेळाडूंची विक्री आणि 16 खेळाडू हे राखीव आहेत. तर 28 खेळाडूंची विक्री झालेली नाही.

या स्पर्धेच्या विजेता संघाला 51 हजारांचे पहिले बक्षिस दिले जाणार आहेत. तर इतर संघांना सहभागासाठी बक्षिसे दिले जाणार आहे. तसेच सामना दरम्यान, प्रत्येक धावासाठी दहा रुपये तर मिळालेल्या विकेट्स साठी साठ रुपये दिले जाणार आहे. यासह सामन्याचा मानकरी, स्पर्धेचा मानकरी, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक यांनाही पारितोषिके मिळणार आहेत. सदर स्पर्धा लिग स्वरुपाने खेळविली जाणार असून प्रत्येक संघ हा एकमेकांशी खेळणार आहे.

सदर स्पर्धा खेळविण्यासाठी योगेश व्हटकर, अभिजीत कांबळे, रविंद्र (पप्पू) सोनवणे, सूरज अहिवळे, शुभम चव्हाण, सुजित बगाडे, भीमरत्न, सोहेल शेख, बारीक कांबळे, सुरज विश्वकर्मा, सम्राट गायकवाड, दयावान दामोदर आदींनी आयोजन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा:  facebook.com/Newslivemarathi