कोरोनामहाराष्ट्र

कोकणात जाताना करोना चाचणीची सक्ती

Newsliveमराठी – गणेशोत्सवासाठी कोकणात १२ तारखेपर्यंत दाखल होण्याची मुदत आता संपली आहे. त्यामुळे गुरुवारपासून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

ई- पास आणि करोना चाचणी अहवाल असल्याशिवाय गणेशभक्तांना कोकणात प्रवेश दिला जात नाही. मुंबई -गोवा महामार्गावर यासाठी तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुरूवातीला १४ दिवस आणि नंतर १० दिवस क्वोरंटाईनची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सुरूवातीला ७ ऑगस्ट आणि नंतर १२ ऑगस्टपुर्वी गणेशभक्तांनी कोकणात दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले होते.

आता मात्र ही मुदत संपली आहे. त्यामुळे कोकणात दाखल होणाऱ्या सर्व गणेश भक्तांना आजपासून ई पास आणि करोना चाचणी केल्याचा अहवाल सक्तीचा असणार आहे. अन्यथा त्यांना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी मुंबई -गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके उभारले आहेत.