महाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने व्यथित- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिला आहे. आज मराठा आरक्षणप्रश्नी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन ‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे व्यथित झालो आहे.

समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करु!’ अशी प्रतिक्रिया दिली. याचबरोबर फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये ‘मराठा आरक्षणावर मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेल्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले, असेही फडणवीस म्हणाले.

यामुळे आता राज्य सरकारवर टीका होत आहे. मराठा समाजाने अनेक मोठी आंदोलने केली. मूक मोर्चे काढले मात्र हे आरक्षण शेवटी टिकले नाही.