कृषीराजकारण

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचं निधन

Newsliveमराठी– भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती.

त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली. त्यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.चेतन चौहान यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंततर प्रकृती बिघडल्यामुळे चौहान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.