कोरोनामहाराष्ट्रराजकारण

सहकार क्षेत्रातील नेता माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

Newsliveमराठी – सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचे पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री 11.35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 85 वर्षांचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

सुधाकरपंत परिचारक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पंढरपुरात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी १०.३० वाजता त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत.