आंतरराष्ट्रीयराजकारण

‘माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर-वन’

Newslive मराठी –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान व दिवंगत नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली.  उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील प्रचारादरम्यान मोदी बोलत होते.

‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ ठेवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’च्या रूपात झाला, असे मोदी म्हणाले.

नामदार हा अहंकार तुम्हाला संपवून टाकेल. हा देश चुकांना माफ करतो, पण धोकेबाजी कधी माफ करत नाही, असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतेय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असा पलटवार राहुल गांधी यांनी मोदीवर केला आहे.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi