आंतरराष्ट्रीय देश-विदेश

दहशतवाद्यांविरोधात लढताना ४ जवान शहीद

Newslive मराठी-  पुलवामा येथील सीरआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम राबवली. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जवान यात जखमी झाला आहे.

दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाजी रशीद आणि कामरान यांना ठार करण्यात यश आले आहे. गाजी रशीद यानेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता, तर कामरान हा या हल्ल्याच्या कटात सहभागी होता. ज्या इमारतीत दहशतवादी लपले होते, ती इमारतही सुरक्षादलाच्या जवानांनी स्फोट करत उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे.

मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही….

बारामतीत सीरआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करू- पुतिन

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *