Newslive मराठी- मुंबईच्या कुर्ला पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला होता, त्यानंतर १ जानेवारी रोजी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
मुख्तार शेख (३९) आणि शाहिद आरिफ(४८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित विवाहीत महिला ३१ डिसेंबरच्या रात्री घराबाहेरील सार्वजनिक शौचास जात असताना तिला तीन जणांनी रस्त्यावरच तिला अडवले व एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कोणासमोर काही बोलली तर जीवेमारण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडितेने हिंमत करुन त्याच दिवशी (१ जानेवारी) कुर्ला पोलीस स्थानक गाठलं आणि तक्रार केली. महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्याप तिसरा आरोपी फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.