आंतरराष्ट्रीयव्यापार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर गीता गोपीनाथ

Newslive मराठी- भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदाची सूत्रे स्विकारली. अर्थतज्ञपदाची जबाबदारी लाभलेल्या त्या पहिल्या महिला आधिकारी ठरल्या आहेत. ४७ वर्षीय गीता मूळच्या म्हैसूरच्या असून त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.

गीता या असामान्य बुद्धीच्या अर्थतज्ज्ञ असून त्यांना पुरेसा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. तसेच, त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुणही आहेत, अशा शब्दांत नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टाइन लेगार्ड यांनी गीता यांची प्रशंसा केली होती.

दरम्यान, जगभरातील अनेक देशांत जागतिकीकरणाची पिछेहाट होताना दिसत असून हे मोठे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया गीता यांनी दिली.