कोरोनामहाराष्ट्र

जेनेलीया देशमुखने केली कोरोनावर मात

सध्या राजकीय नेत्यांपासून तर अनेक सिनेकलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. एकीकडे कोरोनामुळे सिनेमा विश्वाला आर्थिक फटका बसला आहे. अनेक कलाकारांनी सिनेसृष्टी प्रमाणेच खऱ्या आयुष्यातही विजय मिळवला आहे.

अभिनेता रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुखलाही कोरोनाची लागण झाली होती. तिने ३ आठवड्यांपूर्वी कोरोना चाचणी केली होती. तेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. याबाबत तिने स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. जेनेलिया गेल्या २१ दिवसांपासून कोरोविरोधात लढा देत आहे. आज तिने पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली. तिचा आज कोरोना चाचणी केलेला अहवाल नेगेटिव्ह आला आहे.

कोरोना रुग्ण बरा होतो पण २१ दिवस मी आयसोलेशनमध्ये होते आणि हे २१ दिवस माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होते. मी खूप खूष आहे. मी माझ्या परिवारासोबत आहे, असेही जेनेलिया तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. विषाणूला दोन हात करण्यासाठी टेस्ट लवकर करा, पौष्टिक आहार घ्या आणि तंदुरुस्त रहा, असा सल्लाही जेनेलियाने दिला आहे.