बारामती महाराष्ट्र

गिरीश महाजन; बारामतीत या तुम्हाला दाखवतो- अजित पवार

Newslive मराठी-  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला पक्षाने जबाबदारी दिली तर मी पवारांची बारामती जिंकून दाखवू असे विधान एका कार्यक्रमात केलं होत.

मात्र बारामती काय आहे ते माहिती आहे का? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत पवार यांनी महाजन यांना खुले आव्हान केलं आहे.  राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेनिमित्त पारोळा येथे जाहिर सभेत बोलत होते.

बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केले आहे. गेल्या ५० वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. उगाच काहीही, उचलली जीभ लावली टाळूला,असंही पवार यावेळी म्हणाले.

संबधित बातमी-

पक्षाने जबाबदारी दिली तर बारामती पालिकाही जिंकून दाखवू- गिरीश महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *